शुक्रवारी अमेरिकेतील Nasdaq मध्ये **2.8%** ची घसरण झाली, ज्याचा थेट परिणाम भारतीय IT शेअर्सवर दिसून येत आहे. अमेरिकन टेक कंपन्यांचा AI वरील अवाढव्य खर्च भारतीय आयटी कंपन्यांच्या बजेटला कात्री लावणार का, असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडला आहे.
शुक्रवारी रात्री अमेरिकेतील Nasdaq इंडेक्समध्ये झालेल्या 2.8% घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारातील IT सेक्टरला बसताना दिसत आहे. एका बाजूला BSE Sensex मध्ये 900 हून अधिक अंकांची तेजी असतानाही, IT क्षेत्रातील शेअर्स मात्र लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. यात प्रामुख्याने Infosys, Tech Mahindra आणि E2E Networks, ESDS Software यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे.
गुंतवणुकीच्या धोरणात बदल
अमेरिकन टेक कंपन्यांच्या कॅपिटल अलोकेशनमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत अमेरिकन टेक कंपन्यांनी शेअर बायबॅकमध्ये 83% ची मोठी कपात केली आहे. हा सर्व पैसा आता AI इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर खर्च केला जात आहे. अमेरिकन क्लायंट्स जर सॉफ्टवेअर सर्व्हिसेसऐवजी हार्डवेअरवर जास्त भर देत असतील, तर भारतीय IT कंपन्यांच्या प्रोजेक्ट्सना मिळणाऱ्या मागणीवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
IT सेक्टरची पुढची दिशा
ऑक्टोबर महिन्यात Nifty IT इंडेक्सने 17.7% ची जोरदार मुसंडी मारली होती, परंतु आताचे वातावरण पूर्णपणे बदलले आहे. बाजाराचा कल आता 'स्पेक्ट्युलेटिव्ह' पेक्षा 'अर्निग ग्रोथ'वर आधारित कंपन्यांकडे वळत आहे. भविष्यात अमेरिकन कंपन्यांच्या खर्चाचे नियोजन पाहता, भारतीय आयटी कंपन्या किती प्रभावीपणे आपल्या एआय (AI) सेवांची उपयुक्तता सिद्ध करतात, यावरच त्यांचे पुनरागमन अवलंबून असेल.
