जपानी व्हॉईस ॲक्टर Kenjiro Tsuda यांनी TikTok विरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली आहे. एका निनावी अकाउंटने AI चा वापर करून त्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल केल्याचा आणि त्यातून पैसे कमावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध जपानी व्हॉईस ॲक्टर Kenjiro Tsuda यांनी टोकियो जिल्हा न्यायालयात TikTok विरोधात धाव घेतली आहे. 'Jujutsu Kaisen' आणि 'Yu-Gi-Oh!' सारख्या मोठ्या ॲनिमेशन्ससाठी आवाज देणाऱ्या Tsuda यांचा आरोप आहे की, एका निनावी अकाउंटने त्यांच्या आवाजाचा AI द्वारे गैरवापर केला आहे. हे अकाउंट २ लाख पेक्षा जास्त सबस्क्राइबर्स असलेल्या चॅनेलवर त्यांच्या आवाजाचा वापर करून कन्स्पिरेसी आणि गूढ विषयांवरील कंटेंन्ट बनवत होते.
TikTok ची भूमिका
या आरोपांवर TikTok ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीने स्वतःला 'न्यूट्रल होस्टिंग प्लॅटफॉर्म' असल्याचे सांगत, ते व्हिडिओ युझरने तयार केलेले आहेत असे म्हटले आहे. कंपनीच्या मते, तो आवाज Tsuda यांचा नसून केवळ एक सामान्य पुरुषी आवाज आहे. सध्याच्या जपानी कायद्यानुसार, कंपनीला अशा कंटेंटसाठी थेट जबाबदार धरता येत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि कायदे
या खटल्याकडे जपानमधील 'Japan Actors Union' आणि संपूर्ण मनोरंजन क्षेत्र बारीक लक्ष ठेवून आहे. जपानच्या न्याय मंत्रालयाने आवाजाला 'व्यक्तीची ओळख' मानण्याचे निर्देश दिले असले, तरी त्याला सध्या कायदेशीर बळ नाही. या खटल्याचा निकाल केवळ जपानमध्येच नव्हे, तर जागतिक स्तरावर AI च्या वापराबाबत आणि सेलिब्रिटींच्या डिजिटल अधिकारांबाबत नवा पायंडा पाडू शकतो.
