आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे होणाऱ्या डीपफेक फसवणुकीला रोखण्यासाठी Google ने 'SynthID Detector' हे नवीन टूल सादर केले आहे. हे टूल अदृश्य वॉटरमार्कद्वारे AI-व्युत्पन्न फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओची ओळख पटवण्यास मदत करेल.
सायबर फसवणुकीला लगाम
आजच्या काळात डीपफेक तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झाले असून, कॉर्पोरेट जगतात आर्थिक फसवणुकीचा धोका वाढला आहे. बँकिंग आणि फायनान्शिअल सेवा देणाऱ्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून Google ने SynthID Detector लाँच केले आहे. हे टूल फाईल्स स्कॅन करून त्यातील अदृश्य वॉटरमार्क शोधते, जे सामान्य फॉरेन्सिक टूल्सना सापडत नाहीत.
हे टूल कसे काम करते?
हे टूल HEIC, JPEG, MP3 आणि WAV सारख्या फॉरमॅट्सना सपोर्ट करते. विशेष म्हणजे, हे टूल OpenAI, NVIDIA आणि Kakao यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या AI मॉडेल्सनी तयार केलेल्या सामग्रीला सहज ओळखू शकते. मात्र, Meta आणि Microsoft च्या मॉडेल्सद्वारे बनवलेली सामग्री सध्या हे टूल ओळखू शकत नाही.
गुंतवणूकदारांसाठी सावधगिरीचा इशारा
तज्ज्ञांच्या मते, हे टूल म्हणजे १००% सुरक्षितता नाही, तर तो एक केवळ एक 'प्रोबॅबिलिस्टिक फिल्टर' आहे. जर टूलने फाईल सुरक्षित असल्याचे दर्शवले, तरी ती खरीच असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे, मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी केवळ या टूलवर अवलंबून न राहता, कंपन्यांनी Multi-factor authentication आणि प्रत्यक्ष मानवी पडताळणीची पद्धत सुरू ठेवणे गरजेचे आहे.
येणाऱ्या काळात सायबर सुरक्षेवरील खर्च वाढणार असून, ज्या कंपन्या ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली वेगाने स्वीकारतील, त्यांना अधिक सुरक्षिततेचा लाभ मिळणार आहे.
