ज्युनिअर वकिलांना संधी देण्यावर भर
सुप्रीम कोर्टाने उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान केस मेंशनिंगसाठी सिनियर वकिलांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बारमधील अनुभवी आणि नवीन वकिलांमधील संतुलन साधण्याचा प्रयत्न कोर्टाकडून केला जात आहे. आता केवळ ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड हेच केस मेंशन करू शकणार आहेत. यामुळे कोर्टात वरिष्ठ वकिलांचा जो दबदबा असतो, तो कमी होण्यास मदत होईल. जस्टिस विक्रम नाथ, पीबी वराळे, संजय कॅरोल आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या नेतृत्वाखालील बेंच या नियमांची अंमलबजावणी करत आहेत. यामुळे तातडीच्या कामांसाठी सिनियर वकिलांवर अवलंबून राहण्याची प्रथा संपुष्टात येईल.
