सरकारने स्मार्टफोन स्क्रीन प्रोटेक्टर्ससाठी BIS सर्टिफिकेशन अनिवार्य केले असून, या निर्णयाचा मोठा फायदा Optiemus Infracom ला मिळण्याची चिन्हे आहेत. बातमी येताच शेअरमध्ये **14%** ची जबरदस्त तेजी पाहायला मिळाली.
स्मार्टफोन स्क्रीन प्रोटेक्टर्सच्या गुणवत्तेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली असून, आता १ एप्रिल 2027 पासून भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व स्क्रीन प्रोटेक्टर्सना Bureau of Indian Standards (BIS) कडून प्रमाणित असणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या स्वस्त आयातीला चाप बसणार असून, स्थानिक उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Optiemus Infracom चा प्लॅन काय?
या सरकारी निर्णयाचा थेट फायदा Optiemus Infracom ला मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने आधीच RhinoTech या ब्रँडच्या माध्यमातून या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीचे हे स्क्रीन प्रोटेक्टर्स नोएडामधील फॅसिलिटीमध्ये, अमेरिकन कंपनी Corning Incorporated कडून घेतलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केले जातात. व्यवस्थापनाने या व्यवसायातून मार्च 2027 पर्यंत ₹2,000 कोटी ते ₹2,800 कोटींचे रेव्हेन्यू मिळवण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे.
गुंतवणूदारांसाठी सतर्कता
मात्र, गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, 2027 ची डेडलाईन अजून दूर आहे. जरी असंगठित क्षेत्रातील कंपन्यांवर यामुळे अंकुश येईल, तरीही बाजारात इतर अनेक दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा कायम असेल. तसेच, उत्पादनाचा खर्च नियंत्रित ठेवणे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवण्यासाठी लागणारे भांडवली गुंतवणूक (Capital Expenditure) हे कंपनीसमोरील मोठे आव्हान असणार आहे. कंपनी आपली कामगिरी कशी सुधारते आणि मार्केटमध्ये आपला वाटा कसा वाढवते, याकडे शेअरधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
