Abu Dhabi स्थित $125 अब्ज मालमत्ता हाताळणाऱ्या Lunate या कंपनीने भारताला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे डेस्टिनेशन मानले आहे. जरी भारतीय शेअर्स सध्या महाग वाटत असले, तरी देशांतर्गत आर्थिक प्रगती सर्व जोखीम भरून काढेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
भारताची अर्थव्यवस्था वेगळी ठरतेय
सुमारे $125 अब्ज मालमत्तेचे व्यवस्थापन करणारी अबू धाबीची गुंतवणूक फर्म Lunate हिने भारतावर आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक सायकलच्या चढ-उतारांपासून बऱ्यापैकी सुरक्षित आणि स्वतंत्र असल्याचे कंपनीचे मत आहे.
महागड्या व्हॅल्युएशनचे आव्हान
Lunate ने स्पष्ट केले आहे की, सध्या भारतीय शेअर्सचे व्हॅल्युएशन जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत 'महगडे' आहे. याचा अर्थ असा की, इतर देशांच्या तुलनेत गुंतवणूकदारांना प्रत्येक रुपयाच्या कमाईसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे. यामुळेच, कंपनीने गुंतवणूकदारांना कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करताना अत्यंत सावध राहण्याचा आणि किमतीबाबत शिस्त पाळण्याचा सल्ला दिला आहे.
'बॉटम-अप' रणनीतीवर भर
आता ही फर्म संपूर्ण मार्केट खरेदी करण्याऐवजी 'बॉटम-अप' (Bottom-up) रणनीती वापरत आहे. याचा अर्थ असा की, ते ब्रॉड इंडेक्सवर अवलंबून न राहता, मजबूत बिझनेस असलेल्या विशिष्ट कंपन्यांची निवड करत आहेत. सध्या ल्युनेटची National Stock Exchange of India, ICICI Prudential Asset Management, Aadhar Housing Finance आणि हवामान-केंद्रित उपक्रम Evren मध्ये गुंतवणूक आहे.
उत्तर आशियाई बाजारपेठेपेक्षा भारत अधिक सुरक्षित
उत्तर आशियातील बाजारपेठा सेमीकंडक्टर आणि टेक निर्यातीवर अवलंबून असल्याने तिथे जागतिक मागणीनुसार अस्थिरता दिसते. याउलट, भारताची वाढ घरगुती मागणीवर आधारित आहे, ज्यामुळे ही बाजारपेठ अधिक स्थिर वाटत असली तरी सध्याची महागडी किंमत हे एक मोठे आव्हान आहे. कंपनीच्या मते, भविष्यातील परतावा हा निव्वळ मार्केट ट्रेंडवर नाही, तर चांगल्या दर्जाच्या कंपन्यांच्या निवडीवर अवलंबून असेल.
