Tata Motors ने Amazon India सोबत एक मोठा करार केला असून, पुढच्या तीन वर्षांत कंपनी त्यांना ३,००० इलेक्ट्रिक ट्रक पुरवणार आहे. ग्रीन लॉजिस्टिकच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, यामुळे टाटा मोटर्सच्या कमर्शियल ईव्ही व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
Tata Motors ने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज Amazon सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या करारानुसार, आगामी ३ वर्षांत Amazon च्या भारतीय लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये ३,००० टाटा इलेक्ट्रिक ट्रक समाविष्ट केले जाणार आहेत. या प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
कमर्शियल ईव्हीवर टाटा मोटर्सचा भर
टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांपासून आपल्या Ace EV सीरिजच्या माध्यमातून कमर्शियल ईव्ही पोर्टफोलिओ मजबूत केला आहे. Amazon सारख्या मोठ्या क्लायंटसोबतचा हा करार केवळ विक्रीपुरता मर्यादित नसून, तो एका दीर्घकालीन भागीदारीचा भाग आहे. यातून कंपनीला रिअल-वर्ल्ड डेटा मिळेल, ज्याचा वापर करून ते आपली बॅटरी आणि वाहनांची तंत्रज्ञान अधिक प्रगत करू शकतील.
Amazon चा 'ग्रीन' प्लॅन
Amazon कडून आपल्या कार्बन उत्सर्जनात कपात करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधन खर्च आणि इंजिन मेंटेनन्सचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असे कंपनीचे नियोजन आहे.
गुंतवणूदारांसाठी मॉनिटर करण्यासारख्या गोष्टी
हा करार जरी सकारात्मक असला, तरी काही आव्हाने आहेत. कमर्शियल ट्रकचा वापर हा खाजगी कारपेक्षा जास्त असतो, त्यामुळे बॅटरीचे आयुष्य आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता यावर सर्व काही अवलंबून असेल. जर चार्जिंग नेटवर्कमध्ये काही अडचणी आल्या, तर लॉजिस्टिकमध्ये अडथळे येऊ शकतात. गुंतवणूकदारांनी आता या ३,००० ट्रक्सची डिलिव्हरी गती आणि कंपनीच्या मेंटेनन्स सेवेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
