इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. Ather Energy ने मार्केट व्हॅल्युएशनमध्ये Ola Electric ला मागे टाकत आघाडी घेतली आहे. एका बाजूला Ather ने पहिल्यांदाच नफा (Net Profit) कमावून सेल्समध्ये मोठी वाढ नोंदवली आहे, तर दुसरीकडे Ola च्या विक्रीत आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी घसरण झाली आहे.
भारतीय ईव्ही (EV) क्षेत्रात गुंतवणूकदारांचा कल आता स्पष्टपणे बदलत आहे. Ather Energy चे मार्केट व्हॅल्युएशन आता ₹६५,००० कोटींवर पोहोचले असून, ते Ola Electric च्या ₹१६,००० कोटींच्या व्हॅल्युएशनच्या तुलनेत तीन पटीने जास्त आहे. एकेकाळी बाजारातील लीडर असलेल्या Ola साठी ही एक मोठी पडती काळ ठरत आहे.
Ather ची घोडदौड
मे २०२५ मध्ये ₹३२६ च्या किमतीवर लिस्ट झालेल्या Ather च्या शेअर्सने ₹१,६०० चा टप्पा गाठला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने पहिल्यांदाच नेट प्रॉफिट नोंदवला आहे. एवढेच नाही तर, सप्टेंबर २०२६ मध्ये कंपनीने २८,००० युनिट्सची विक्री केली, जी दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत १२०% जास्त आहे.
Ola Electric समोरील आव्हाने
दुसरीकडे, ऑगस्ट २०२४ च्या आयपीओ (IPO) नंतर Ola चे मार्केट कॅप ₹६४,००० कोटींवरून मोठ्या प्रमाणात खाली आले आहे. कंपनीचा शेअर त्याच्या इश्यू प्राईसच्या ५०% खाली ट्रेड करत आहे. विक्रीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास, सुरुवातीच्या काळात ४०,००० युनिट्स विकणारी कंपनी आता १२,००० युनिट्सच्या खाली आली आहे.
विश्लेषकांच्या मते, Ather ने प्रोडक्ट क्वालिटी आणि विश्वासार्हतेवर भर दिला, तर Ola ला सर्व्हिस बॅकलॉग आणि गाड्यांच्या तांत्रिक समस्यांमुळे ग्राहकांचा रोष पत्करावा लागला आहे. आता Ola आपले बिझनेस मॉडेल बदलून डीलर-आधारित नेटवर्कवर भर देत आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष याकडे असेल की, Ola पुन्हा आपला ब्रँड विश्वास कसा कमावते आणि Ather आपला हा नफ्याचा वेग कसा टिकवून ठेवते.
