ब्रोकरने केली होती गुंतवणुकीची चौकशी?
Financial Times च्या अहवालानुसार, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी संबंधित एका ब्रोकरने फेब्रुवारी महिन्यात BlackRock या कंपनीशी संपर्क साधला होता. त्यांनी BlackRock च्या Defence Industrials Active ETF मध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याबद्दल चौकशी केली होती. विशेष म्हणजे, हे संभाषण इराणवर अमेरिकेने लष्करी कारवाई सुरू करण्याच्या काही आठवडे आधीच झाल्याचे बोलले जात आहे.
पेंटागॉनचा स्पष्ट इन्कार
या आरोपांवर पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल (Sean Parnell) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी X (पूर्वीचे Twitter) वर स्पष्ट केले की, ही बातमी 'पूर्णपणे खोटी आणि बनावट' असून ती मागे घ्यावी अशी मागणी केली. पार्नेल म्हणाले की, संरक्षण सचिव हेगसेथ किंवा त्यांच्या वतीने कोणीही BlackRock शी अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी संपर्क साधला नव्हता.
गुंतवणूक प्रत्यक्षात झाली नाही?
Financial Times च्या अहवालात असेही नमूद केले आहे की, चर्चेनंतरही ही गुंतवणूक प्रत्यक्षात झाली नाही. याचे कारण असे की, हा फंड (जो मागील वर्षी मे मध्ये सुरू झाला होता) त्यावेळी Morgan Stanley च्या ग्राहकांसाठी उपलब्ध नव्हता. या ब्रोकरला किती अधिकार होते किंवा संरक्षण सचिव हेगसेथ यांना या चर्चेची माहिती होती का, हे अहवालात स्पष्ट केलेले नाही. मात्र, मोठ्या सरकारी निर्णयांपूर्वी झालेल्या आर्थिक व्यवहारांवर वाढत्या लक्ष्यादरम्यान हा प्रकार समोर आला आहे.