Spotify आता AI च्या युगात
Spotify आपल्या म्युझिक स्ट्रीमिंगच्या पलीकडे जाऊन जनरेटिव्ह AI ऑडिओ प्लॅटफॉर्म म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. 2025 च्या इन्व्हेस्टर डे (Investor Day) मध्ये कंपनीने ही नवी रणनीती जाहीर केली. यानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून नवनवीन ऑडिओ अनुभव तयार केले जातील. कंपनीचे को-सीईओ गुस्ताव सोडरस्ट्रॉम (Gustav Söderström) यांच्या मते, हा 'ॲक्सेस ते पर्सनलायझेशन आणि आता जनरेशन' (Access to personalization, and now to generation) या दिशेने टाकलेले नैसर्गिक पाऊल आहे. संगीत कॅटलॉग्सचं (Music Catalogs) महत्त्व कमी होत चालल्यामुळे, भविष्यात AI-आधारित पर्सनलायझेशन आणि वैयक्तिक श्रोत्यांसाठी खास कंटेंट तयार करण्यावरच स्पर्धा टिकून राहील, या पार्श्वभूमीवर Spotify ने हा निर्णय घेतला आहे. कंपनी 'लार्ज टेस्ट मॉडेल' (Large Taste Model) विकसित करत आहे, जे संगीत, पॉडकास्ट आणि ऑडिओबुक्सवरील दररोजच्या कोट्यवधी युझर सिग्नल्सचे विश्लेषण करेल. यामुळे गेली दोन दशके जमा झालेला युझर डेटा वापरून मोठ्या टेक कंपन्यांशी स्पर्धा करण्याची संधी मिळेल.
