AI स्टार्टअप Baseten एका मोठ्या फंडिंग राउंडच्या अंतिम टप्प्यात आहे. यातून कंपनीचं व्हॅल्युएशन तब्बल $13 बिलियन डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे, जे फक्त ५ महिन्यांपूर्वी $5 बिलियन डॉलर होते. या डीलमध्ये स्प्लिट-प्राइज्ड स्ट्रक्चरचा समावेश आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या व्हॅल्युएशनवर कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
काय घडलंय?
AI इन्फरन्स (AI Inference) क्षेत्रातील स्टार्टअप Baseten एका मोठ्या फंडिंग राऊंडच्या अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे. यातून कंपनी तब्बल $1.5 बिलियन डॉलरचं फंडिंग मिळवण्याची शक्यता आहे. या नवीन गुंतवणुकीमुळे कंपनीचं व्हॅल्युएशन $13 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतं, जे केवळ पाच महिन्यांपूर्वी $5 बिलियन डॉलर होतं. रिपोर्ट्सनुसार, Spark Capital, Sands Capital, Altimeter Capital आणि Wellington Management सारख्या मोठ्या व्हेंचर कॅपिटल कंपन्या या डीलमध्ये आघाडीवर आहेत. हा स्टार्टअप AI मॉडेल्स माहितीवर प्रक्रिया कशी करतात आणि युझर्ससाठी निकाल कसे तयार करतात, याचं ऑप्टिमायझेशन करण्यावर काम करतो.
