RBI च्या सुरक्षा उपायांनुसार Paytm ची नवी तयारी
One 97 Communications Limited द्वारे चालवल्या जाणाऱ्या Paytm ने आता आपल्या पेमेंट सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या वाढत्या सुरक्षा उपायांनुसार, UPI ट्रान्झॅक्शन्स आणि कार्डलेस ATM विथड्रॉवलसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (Biometric Authentication) उपलब्ध झाले आहे. यामुळे युजर्सना केवळ फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन वापरून पेमेंटची पुष्टी करता येईल, बॅलन्स तपासता येईल आणि पैसे काढता येतील. विशेष म्हणजे, यासाठी UPI PIN टाकण्याची गरज भासणार नाही.
Paytm नुसार, ही बायोमेट्रिक माहिती पूर्णपणे युजरच्या डिव्हाइसवरच प्रोसेस आणि स्टोअर केली जाईल, ज्यामुळे प्रायव्हसी (Privacy) जपली जाईल. UPI पेमेंटसाठी बायोमेट्रिक्स वापरण्याची मर्यादा ₹5,000 पर्यंत आहे, जी NPCI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. मोठी रक्कम असल्यास UPI PIN चा पर्याय नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल.