SEBI ने आता F&O ट्रेडिंगमधील 'Closing Auction Session' (CAS) मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बाजारातील अस्थिरता आणि एक्स्पायरी डेला होणारी चढ-उतार नियंत्रित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
काय बदलणार क्लोजिंग ऑक्शन सेशनमध्ये?
ऑगस्ट ३, २०२६ रोजी लागू करण्यात आलेल्या 'क्लोजिंग ऑक्शन सेशन' (CAS) मुळे बाजारात अनपेक्षित वोलॅटिलिटी दिसून आली होती. विशेषतः Bombay Stock Exchange (BSE) वर ट्रेडिंगच्या शेवटच्या मिनिटांत वॉल्यूममध्ये मोठी वाढ झाली होती, ज्यामुळे कृत्रिम तेजी-मंदीचा धोका वाढला होता. हे टाळण्यासाठी SEBI ने १२ सप्टेंबर रोजी एक सात-सूत्री योजना जाहीर केली आहे.
प्रमुख प्रस्ताव:
- IIV डेटा बंद: ऑक्शन दरम्यान दर्शविले जाणारे 'Indicative Index Value' (IIV) आता बंद केले जाऊ शकते, कारण यामुळे ट्रेडर्समध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
- सेटलमेंटमध्ये बदल: एक्स्पायरी डेसाठी SEBI ने दोन मार्ग सुचवले आहेत. एकतर शेवटच्या ३० मिनिटांचा आणि १० मिनिटांच्या ऑक्शनचा मिळून 'ब्ेंडेड VWAP' वापरणे किंवा जुन्या पद्धतीकडे वर्षभरासाठी परत जाणे.
- ऑर्डर कॅन्सलेशनवर निर्बंध: आता १% पेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर्स सहजपणे रद्द करता येणार नाहीत. यामुळे बाजारात फेरफार करण्याचा (Manipulation) प्रयत्न करणाऱ्यांवर चाप बसेल.
- टायमिंगमध्ये कपात: ऑक्शनपूर्वीचा ५ मिनिटांचा ट्रान्झिशन वेळ कमी करून १ मिनिट आणि त्यानंतरचा ट्रेडिंग विंडो १० मिनिटांवरून ५ मिनिटांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.
SEBI ने या सर्व बदलांवर ३ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत सामान्य जनतेकडून आणि भागधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. या बदलांमुळे भविष्यात एक्स्पायरी डेचे ट्रेडिंग अधिक पारदर्शक आणि स्थिर होईल अशी अपेक्षा आहे.
