Financial Stability and Development Council (FSDC) च्या ३० व्या बैठकीत देशाच्या आर्थिक स्थिरतेवर चर्चा झाली. AI चा वाढता वापर आणि ग्लोबल बॉन्ड यील्डमधील तेजी हे भारतीय बाजारासाठी मोठे धोके असल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या ३० व्या FSDC बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या आर्थिक सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत RBI, SEBI, IRDAI आणि PFRDA चे प्रमुख उपस्थित होते.
प्रमुख धोके आणि आव्हाने
बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि वाढते ग्लोबल बॉन्ड यील्ड यांवर सविस्तर चर्चा झाली. ग्लोबल बॉन्ड यील्ड वाढल्यामुळे कर्जाचा खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या भावनेवर (Investor Sentiment) होतो. या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी सरकारी स्तरावर तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि KYC सुलभता
एमएसएमई (MSMEs) क्षेत्राला सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 'युनिफाईड लेंडिंग इंटरफेस' आणि 'अकाऊंट ॲग्रीगेटर' फ्रेमवर्क बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, विदेशी गुंतवणूकदारांसाठी (FPI) आणि अनिवासी भारतीयांसाठी (NRI) 'केवायसी' (KYC) प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे, जेणेकरून बाजारात अधिक भांडवल येईल.
सायबर सुरक्षा आणि unclaimed assets
ग्रामीण बँकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत मिळून एक नवीन धोरण आखले जात आहे. याशिवाय, 'युअर मनी, युअर राईट' मोहिमेद्वारे बँकांमधील आणि विमा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून पडून असलेली unclaimed खाती आणि ठेवी शोधून त्या मूळ मालकांना परत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
