RVNL ची मोठी कामगिरी
भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या Rail Vikas Nigam Limited (RVNL) ने एक मोठे इलेक्ट्रीफिकेशन प्रोजेक्ट जिंकले आहे.
उत्तर पूर्व रेल्वेने (North Eastern Railway) RVNL ला ₹129.46 कोटी (करांसहित) किमतीच्या कामासाठी निवडले आहे. या प्रोजेक्टमुळे वाराणसी-प्रयागराज रेल्वे मार्गावरील वीज पुरवठा क्षमता सुधारण्यास मदत होईल.
प्रकल्पाचे स्वरूप
या कामामध्ये 2x25 KV ऑटो-ट्रान्सफॉर्मर (AT) प्रणालीसाठी ट्रॅक्शन सबस्टेशन्स आणि स्विचिंग पोस्ट्सची डिझाईन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग यांचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 730 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. RVNL ने स्पष्ट केले आहे की हा त्यांच्या नेहमीच्या व्यवसायाचा भाग आहे आणि यात कोणत्याही संबंधित पक्षांचा समावेश नाही.
शेअर बाजारातील कामगिरी
सध्या, 20 मे रोजी RVNL च्या शेअरमध्ये 0.72% ची किरकोळ घट दिसून आली. मागील एका महिन्यात शेअर 8.99% नी घसरला आहे, तर वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 25.43% चा तोटा झाला आहे. या नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे कंपनीच्या भविष्यातील व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
