रिटायरमेंटचे नियोजन करताना बाजारातील चढ-उतारांचा फटका बसू नये म्हणून 'थ्री-बकेट स्ट्रॅटेजी' अत्यंत प्रभावी ठरते. यामध्ये मालमत्तेचे वर्गीकरण वेळेच्या मर्यादेनुसार (Time Horizon) करून आपत्कालीन परिस्थितीतही गुंतवणुकीवर परिणाम न होऊ देता नियमित कैश फ्लो राखला जातो.
रिटायरमेंट प्लॅनिंग करताना दररोजच्या गरजा आणि महागाईवर मात करण्यासाठी संपत्ती वाढवणे, यांचा समतोल राखणे कठीण असते. 'थ्री-बकेट स्ट्रॅटेजी' संपूर्ण कॉर्पस एकाच खात्यात न ठेवता, वेळेच्या गरजेनुसार तीन भागात विभागते.
थ्री-बकेट फ्रेमवर्क
पहिले बकेट (लिक्विडिटी - 'आताची' गरज): यात पुढील १ ते ३ वर्षांच्या खर्चासाठी पुरेशी रोकड किंवा अत्यंत लिक्विड फंड्स ठेवले जातात. याचा मुख्य उद्देश म्हणजे मार्केटमधील अस्थिरतेच्या काळात तुम्हाला तुमची दीर्घकालीन गुंतवणूक विकण्याची वेळ येऊ नये.
दुसरे बकेट (सेफ्टी - 'नजीकच्या' भविष्यासाठी): हे बकेट ३ ते ७ वर्षांच्या खर्चासाठी असते. यात बँक डिपॉझिट्स, सरकारी सिक्युरिटीज किंवा शॉर्ट-टर्म डेट फंड्समध्ये गुंतवणूक केली जाते. हे बकेट स्थिर उत्पन्न देते आणि पहिले बकेट संपत आल्यावर त्याला पुन्हा भरण्याचे काम करते.
तिसरे बकेट (ग्रोथ - 'दूरच्या' भविष्यासाठी): उर्वरित सर्व रक्कम यात असते. यात ७ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. याचा उद्देश महागाईपेक्षा जास्त परतावा मिळवणे हा असतो.
सिक्वेन्स-ऑफ-रिटर्न्स रिस्क (Sequence-of-Returns Risk) कशी टाळावी?
रिटायरमेंटच्या सुरुवातीच्या काळातच जर मार्केट क्रॅश झाले, तर अनेकजण घाईत शेअर्स विकून नुकसान करून घेतात. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला बाजारात घसरण असतानाही 'सेफ्टी' आणि 'लिक्विडिटी' बकेटमधून पैसे खर्च करण्याची परवानगी देते, ज्यामुळे 'ग्रोथ' बकेटला सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
रीबॅलेंसिंगचे महत्त्व
हे बकेट्स स्थिर ठेवू नका. जेव्हा शेअर बाजार तेजीत असेल, तेव्हा 'ग्रोथ' बकेटमधील नफा काढून 'लिक्विडिटी' आणि 'सेफ्टी' बकेट पुन्हा भरून ठेवा. या शिस्तबद्ध पद्धतीमुळे तुम्ही महागड्या किमतीला शेअर्स विकून सुरक्षितता वाढवू शकता.
संभाव्य धोके
या स्ट्रॅटेजीमध्ये महागाई हा सर्वात मोठा धोका आहे. जर तुम्ही खूप सावधगिरी बाळगून सर्व पैसे लिक्विडिटी किंवा सेफ्टी बकेटमध्ये ठेवले, तर दीर्घकाळात पोर्टफोलिओची वाढ खुंटू शकते. तसेच, वेळेवर रीबॅलेंसिंग न करणे ही वर्तणुकीशी संबंधित चूक महागात पडू शकते.
