बाजारात IPO चा पुन्हा जोर
भारतीय शेअर बाजारात IPO (Initial Public Offering) साठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. SEBI ने आता ५ कंपन्यांना त्यांचे IPO आणण्यासाठी 'ऑब्झर्वेशन लेटर' दिले आहेत. यामध्ये OYO ची पॅरेंट कंपनी ‘Prism’ (पूर्वीची Oravel Stays) आहे, जी स्वतःच्या IPO मधून तब्बल ₹6,650 कोटी उभारणार आहे. याशिवाय, Advanta Enterprises, Truhome Finance, Mehta Hitech Industries आणि Veegaland Developers या कंपन्याही IPO आणणार आहेत. या सर्व कंपन्या मिळून एकूण ₹10,000 कोटी भांडवल उभारण्याचा मानस आहे.
