Wockhardt: संशोधनाचे फळ FDA च्या मंजुरीने...
फार्मा सेक्टरमध्ये Wockhardt साठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या नवीन अँटीबायोटिक 'Zaynich' ला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (US FDA) मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, हे औषध भारतात तयार झालेले पहिले असे नवीन केमिकल एंटिटी (New Chemical Entity) आहे ज्याला इतकी मोठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या औषधाचे मार्केट सुमारे $9 बिलियन इतके मोठे आहे आणि ते मल्टी-ड्रग रेसिस्टंट (multi-drug resistant) ग्राम-निगेटिव्ह इन्फेक्शनवर (Gram-negative infections) उपयोगी ठरणार आहे. या बातमीने कंपनीच्या शेअरमध्ये 11% ची वाढ झाली. मात्र, आता या औषधाची विक्री आणि वापर वाढवणे हे Wockhardt समोर मोठे आव्हान आहे.
