मुंबईतील Amazon मधील 31 वर्षीय डिजिटल मार्केटिंग तज्ञाने आपला 35 लाखांचा पगार सोडून नाशिक गाठले आहे. कमी उत्पन्न पण कमी खर्चाच्या जीवनशैलीमुळे तिचे वैयक्तिक आर्थिक नियोजन सुधारले असून कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधण्यास मदत झाली आहे.
Detailed Coverage
लाखो रुपये पगार सोडून घेतला मोठा निर्णय
मुंबईतील Amazon मध्ये काम करणाऱ्या एका 31 वर्षीय डिजिटल मार्केटिंग तज्ञने corpoarte नोकरीला रामराम ठोकला आहे. तिचा पगार वर्षाला 30 लाख ते 35 लाख रुपये होता. पण मुंबईतील वाढती महागाई आणि हायब्रिड ऑफिस पॉलिसीच्या नवीन नियमांमुळे तिने हा निर्णय घेतला.
मुंबईतील महागडे जीवन
नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहणाऱ्या या महिला तज्ञाने सांगितले की, एका बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी दर महिन्याला ₹65,000 भाडे द्यावे लागत होते. याशिवाय औरंगाबाद आणि नाशिकला कुटुंबाला भेटण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा याचाही विचार करता, जास्त पगार असूनही आर्थिक नियोजन बिघडत होते. आठवड्यातून दोन दिवस ऑफिसला जाण्याऐवजी पाच दिवस जाण्याची सक्ती झाल्याने तिने हा बदल करण्याचा निर्णय घेतला.
आर्थिक नियोजन आणि बचत
नाशिकला स्थायिक झाल्यानंतर जोडप्याच्या घरचे एकत्रित उत्पन्न ₹40 लाख झाले आहे. उत्पन्नात घट होऊनही, जास्त भाडे आणि राहण्याचा खर्च कमी झाल्यामुळे त्यांची बचत वाढली आहे. पूर्वी कॉर्पोरेट जगात असताना बचत करणे कठीण जात होते, पण आता Systematic Investment Plans (SIPs) आणि इतर गुंतवणुकीसाठी शिस्तबद्धपणे पैसे गुंतवता येत आहेत.
करिअरमधील जोखीम आणि आरोग्य
या बदलामुळे तिला परफॉर्मन्स रिव्ह्यू आणि नोकरी जाण्याची भीती कमी झाली आहे. आता ती एका बिझनेस पार्टनरसोबत स्वतःचा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय चालवते, ज्यामुळे तिला तिच्या कामाच्या वेळेवर जास्त नियंत्रण मिळाले आहे. या बदलामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीही वेळ मिळत आहे, जी गोष्ट कॉर्पोरेट नोकरीत शक्य होत नव्हती. छोट्या शहरांमध्ये मिळणारी लवचिकता आणि स्वतःचा व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे, जी गोष्ट मोठ्या कंपन्यांमधील नोकरीतील स्थैर्य आणि जास्त पगाराच्या तुलनेत महत्त्वाची ठरत आहे.
