Promotion and Regulation of Online Gaming Act, 2025 चे पालन करण्यासाठी Dream11 ने सर्व रिअल-मनी गेमिंग स्पर्धा बंद केल्या आहेत. आता कंपनी AI आधारित स्पोर्ट्स एंगेजमेंट प्लॅटफॉर्म बनण्याच्या तयारीत आहे.
बिझनेस मॉडेलमध्ये आमूलाग्र बदल
Dream11 ने आपल्या कामकाजात मोठा बदल करत रिअल-मनी फॅन्टसी स्पोर्ट्स क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 च्या नवीन कायद्यामुळे ऑनलाइन पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांवर बंदी घालण्यात आली आहे. याच नियमांचे पालन करण्यासाठी कंपनीने आपला मुख्य व्यवसाय, जो 95% महसूल आणि जवळपास 100% प्रॉफिट मिळवून देत होता, तो पूर्णपणे थांबवला आहे. इतकेच नाही तर, ३० जुलै २०२६ रोजी कंपनीने आपली फिनटेक उपकंपनी 'Dream Money' देखील बंद केली आहे.
BCCI ला मोठा झटका
या बदलाचा फटका केवळ कंपनीलाच नाही, तर संपूर्ण क्रीडा क्षेत्राला बसला आहे. Dream11 ने भारतीय क्रिकेट टीमसोबतचा $44 दशलक्ष (सुमारे ₹358 कोटी) चा मोठा स्पॉन्सरशिप करार रद्द केला आहे. यामुळे क्रीडा संघटनांच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून, हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
पुढील आव्हाने काय आहेत?
आता कंपनी AI-आधारित कंटेंट, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल एंगेजमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, 30 कोटी युजर्सना केवळ कंटेंटसाठी प्लॅटफॉर्मवर टिकवून ठेवणे, हे कंपनीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. कंपनीच्या $8 अब्ज व्हॅल्युएशनला या नवीन मॉडेलद्वारे आधार मिळेल का, याकडे सध्या मार्केटच्या नजरा आहेत. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात नवीन गेमिंग कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार असल्याने, कंपनीचा प्रवास अजूनही जोखमीने भरलेला आहे.
