महिला आरोग्य आणि बायोसिमिलर्समध्ये मोठे लक्ष्य
सन फार्माच्या या मोठ्या अधिग्रहणाचा मुख्य उद्देश महिला आरोग्य (Women's Health) आणि बायोसिमिलर्स (Biosimilars) यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करणे आहे. या करारामुळे कंपनी महिला आरोग्य क्षेत्रात जगात टॉप 3 आणि बायोसिमिलर्समध्ये टॉप 7 मध्ये येण्याची शक्यता आहे. ऑर्गॅनॉनकडे 140 देशांमध्ये 70 हून अधिक उत्पादनांचे जागतिक नेटवर्क आहे, ज्यामुळे सन फार्माला लगेचच मोठी बाजारपेठ मिळेल.
कर्जाचा बोजा आणि एकीकरणाचे आव्हान
सन फार्मा Organon & Co. ला $11.75 अब्ज डॉलर्स मध्ये खरेदी करत असली तरी, Organon वर आधीपासूनच $8.6 अब्ज डॉलर्स चे कर्ज आहे. Organon चा FY25 मध्ये $6.2 अब्ज डॉलर्स चा महसूल आणि $1.9 अब्ज डॉलर्स चा Adjust ed EBITDA आहे. सन फार्मा या अधिग्रहणासाठी स्वतःचा निधी आणि बँक फायनान्सिंगचा वापर करणार आहे, ज्यामुळे कंपनीच्या ताळेबंदावर (balance sheet) दबाव येऊ शकतो. 2014 मध्ये रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज (Ranbaxy Laboratories) च्या अधिग्रहणाचा अनुभव पाहता, एकीकरणानंतर (integration) सुरुवातीला कंपनीच्या लिक्विडिटीवर (liquidity) आणि नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
बाजारातील स्पर्धा आणि भविष्यातील शक्यता
बायोसिमिलर्स बाजारपेठ 2031 पर्यंत $112 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जी एक मोठी संधी आहे. मात्र, या क्षेत्रात सँडोज (Sandoz) आणि फायझर (Pfizer) सारखे मोठे खेळाडू आधीपासूनच आहेत. महिला आरोग्य विभागातही फायझर (Pfizer) आणि ॲबव्ही (AbbVie) सारख्या दिग्गज कंपन्या आहेत. 2026 च्या सुरुवातीला $41-46 अब्ज डॉलर्स च्या मार्केट कॅपसह, P/E रेशो सुमारे 32-38x असलेल्या सन फार्मासाठी Organon चे अधिग्रहण एक मोठे पाऊल आहे. 2027 च्या सुरुवातीला हा व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या डीलचे यश Organon च्या कर्जाचे व्यवस्थापन आणि यशस्वी एकीकरणावर अवलंबून असेल.
