Nykaa च्या Q3 निकालांनी लावले अच्छे दिन!
FSN e-Commerce Ventures, जी 'Nykaa' या नावाने ओळखली जाते, कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील (Q3 FY26) निकालांनी गुंतवणूकदारांना आनंदाचा धक्का दिला आहे. कंपनीने ₹63.31 कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) कमावला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 141.55% अधिक आहे. तसेच, कंपनीचा महसूल (Revenue) 26.73% नी वाढून ₹2,873.26 कोटींवर पोहोचला आहे. याशिवाय, EBITDA मध्ये 63% ची मोठी वाढ होऊन तो ₹230 कोटींवर पोहोचला, आणि EBITDA मार्जिन 6.2% वरून 8% पर्यंत सुधारले. या दमदार कामगिरीमुळे ब्रोकरेज फर्म Nomura ने 'Hold' वरून 'Buy' रेटिंग देत टार्गेट प्राईस ₹305 केली आहे, जी 18% च्या अपसाईडची शक्यता दर्शवते.
ब्रोकरेजचा विश्वास, पण चिंता कायम?
Jefferies ने देखील Nykaa च्या निकालांना 'Exceptional' म्हटले आहे आणि 'Buy' रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राईस ₹315 ठेवली आहे. मात्र, या दोन ब्रोकरेज कंपन्यांच्या उत्साहाच्या उलट, इतर विश्लेषकांमध्ये मात्र मतभेद दिसून येत आहेत. एकूण 26 विश्लेषकांपैकी, अनेक जणांनी 3% च्या मर्यादित अपसाईडचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे, 7 विश्लेषकांनी 'Sell' रेटिंग दिले आहे, तर काही जणांनी 'Hold' रेटिंग कायम ठेवली आहे. HDFC Securities ने 'Sell' रेटिंग देऊन टार्गेट ₹200 दिले आहे, तर Motilal Oswal ने 'Neutral' रेटिंगसह ₹280 चा टार्गेट प्राईस सेट केला आहे. यामागे Nykaa च्या Fashion सेगमेंटमधील नफ्याबाबत आणि Valuations बद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान
Nykaa च्या 'Own Brands' पोर्टफोलिओने चांगली कमाई केली आहे, ज्यातून कंपनीला उच्च EBITDA मार्जिन मिळत आहे. Fashion सेगमेंटमध्येही 31% वाढीसह ₹1,476 कोटींचा GMV जमवला आहे. मात्र, भारतीय ई-कॉमर्स मार्केट वेगाने वाढत असले तरी, Myntra आणि Purplle सारखे स्पर्धक अधिक आक्रमकपणे उतरले आहेत. ऑनलाइन फॅशनमध्ये Myntra चा मोठा मार्केट शेअर आहे, तर Purplle सौंदर्य उत्पादनांच्या मार्केटमध्ये वेगाने विस्तार करत आहे. याशिवाय, पर्सनlल केअर सेगमेंटमध्ये जाहिरात खर्च (Advertising Cost) 77% नी वाढला आहे, ज्यामुळे कंपनीसमोरील आव्हाने वाढू शकतात.
भविष्यातील वाटचाल
गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये Nykaa च्या शेअरमध्ये 8% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे ₹74,000 कोटी आहे, परंतु TTM PE रेशो 488 ते 1,151 पर्यंत खूप जास्त आहे. Nomura कंपनीच्या FY27 Estimated Enterprise Value to Sales ला 4.7 पट आकर्षक मानत आहे. मात्र, कंपनीला सतत मार्जिन सुधारणा, Fashion सेगमेंटमधील नफा आणि वाढत्या स्पर्धेचा सामना करत टिकून राहावे लागेल. सध्याच्या Valuations ला न्याय देण्यासाठी Nykaa ला आपल्या ग्राहकांना आकर्षित करून टिकवून ठेवणे आणि विक्री वाढवणे आवश्यक असेल.