LG Electronics India आता आंध्र प्रदेशातील श्री सिटीमध्ये आपला नवा **247 एकर**चा प्लॅन्ट उभारणार आहे. **₹5,000 कोटींच्या** या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कंपनीची उत्पादन क्षमता दुपटीने वाढणार असून लॉजिस्टिकचा खर्चही कमी होणार आहे.
LG Electronics India आता आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे कंपनी 247 एकर जागेवर आपला नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारणार आहे. ₹5,000 कोटींच्या या गुंतवणुकीतून डिसेंबर 2026 पर्यंत कामकाज सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. दक्षिण भारतातील मार्केट कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी 38% वाटा व्यापते, त्यामुळे हा प्रकल्प लॉजिस्टिकच्या दृष्टीने गेम चेंजर ठरेल.
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये धोरणात्मक बदल
नव्या प्लांटमध्ये सुरुवातीला एअर कंडिशनर्स आणि त्यातील महत्त्वाचे पार्ट असलेल्या कॉम्प्रेसरच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. त्यानंतर रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशिनचे उत्पादनही येथे सुरू होईल. परदेशी घटकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी 'लोकल मॅन्युफॅक्चरिंग'वर जोर देत आहे. 2030 पर्यंत हा प्लांट पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर, कंपनीची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता सध्याच्या 14.5 दशलक्ष युनिट्सवरून दुप्पट होण्याचा अंदाज आहे.
जागतिक निर्यातीवर लक्ष
ऑक्टोबर 2025 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून कंपनी वेगाने विस्तारत आहे. सध्या कंपनी 66 देशांत निर्यात करत आहे, जो आकडा लिस्टिंगपूर्वी 47 होता. आता कंपनी 2026 पर्यंत 'एसेंशियल सिरीज'ची उत्पादने 22 देशांत पोहोचवण्याची आणि 2027 पर्यंत 10 नवीन देशांत वॉशिंग मशिन्सची निर्यात करण्याची योजना आखत आहे.
गुंतवणूकदारांच्या नजरा आता या मोठ्या भांडवली खर्चाचा (Capex) कंपनीच्या नफ्यावर आणि मार्जिनवर काय परिणाम होतो, याकडे आहेत. कंपनीची ग्रेटर नोएडा आणि पुणे येथील विद्यमान प्लॅन्ट्सच्या तुलनेत नवीन प्लांटची कार्यक्षमता कशी राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
