रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) Sovereign Gold Bond 2019-20 Series VI साठी प्री-मॅच्युअर रिडेम्प्शन किंमत **₹14,213** प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नवीन टॅक्स नियमांचा विचार करणे गरजेचे आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Sovereign Gold Bond (SGB) 2019-20 Series VI साठी ₹14,213 प्रति ग्रॅम इतकी प्री-मॅच्युअर रिडेम्प्शन किंमत जाहीर केली आहे. ही किंमत ३० ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या एक्झिट विंडोसाठी लागू असेल. ही किंमत निश्चित करण्यासाठी इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) द्वारे जारी केलेल्या मागील ३ दिवसांच्या सोन्याच्या बंद दरांची सरासरी विचारात घेतली जाते.
गुंतवणुकीवर मिळणारा मोठा परतावा
जेव्हा ही मालिका पहिल्यांदा बाजारात आली होती, तेव्हा त्याची इश्यू प्राईस ₹3,835 प्रति ग्रॅम होती, तर डिजिटल गुंतवणूकदारांना ती ₹3,785 प्रति ग्रॅम दराने मिळाली होती. आजची ₹14,213 ची किंमत पाहता, ऑनलाइन गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ₹10,428 चा नफा झाला आहे. म्हणजेच, वार्षिक 2.5% व्याजाव्यतिरिक्त हा सुमारे 275% चा घसघशीत परतावा आहे.
टॅक्सचा फटका (Tax Implications)
गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टॅक्स. सद्य नियमांनुसार, सोन्याच्या बॉण्ड्सवरील कॅपिटल गेन्स टॅक्सची सवलत केवळ मॅच्युरिटीपर्यंत बॉण्ड्स होल्ड करणाऱ्यांनाच मिळते. जर तुम्ही मुदत संपण्यापूर्वीच बॉण्ड्स रिडीम (Premature Redemption) केले, तर आता तुम्हाला त्यावर कॅपिटल गेन्स टॅक्स भरावा लागेल. पूर्वीच्या तुलनेत हा मोठा बदल असून, रिडेम्प्शनचा निर्णय घेताना टॅक्स लायबिलिटी तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
