ब्रोकरेज फर्म PL Capital ने Pearl Global Industries वर 'Buy' रेटिंग दिली असून टार्गेट प्राईस **₹1,500** निश्चित केली आहे. बांगलादेशातील वाढती उत्पादन क्षमता आणि कंपनीचे दीर्घकालीन महसूल उद्दिष्टे हे या तेजीचे मुख्य कारण आहेत.
वाढत्या उत्पादनाचा जोर
कंपनी आपल्या उत्पादन क्षमतेवर मोठा भर देत आहे. बांगलादेशात केलेल्या विस्तारामुळे कंपनीने आपल्या वार्षिक क्षमतेत ७० लाख (7 Million) नग वाढवले असून, आता एकूण क्षमता १०.८ कोटी (108 Million) युनिट्सवर पोहोचली आहे. या विस्ताराच्या जोरावर कंपनी ₹६,००० कोटी महसुलाचे टार्गेट निर्धारित वेळेआधी गाठण्याच्या तयारीत आहे. तसेच, २०३० पर्यंत महसूल ₹९,००० कोटी ते ₹१०,००० कोटी दरम्यान नेण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
व्यवसायाची रणनीती आणि मार्जिन्स
केवळ बांगलादेशच नव्हे, तर कंपनीने 'मल्टी-रिजन' स्ट्रॅटेजी अवलंबली आहे. यात भारतामध्ये नफा वाढवण्यावर भर दिला जात आहे, तर व्हिएतनाममध्ये उच्च-मूल्य (High-value) गारमेंट उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे आणि 'बॅकवर्ड इंटिग्रेशन'मुळे कंपनी आपले प्रॉफिट मार्जिन १२.८% पर्यंत पोहोचवण्याचे ध्येय ठेवून आहे.
गुंतवणूकदारांनी काय लक्षात घ्यावे?
ही कंपनी मोठ्या प्रमाणावर निर्यात (Apparel Export) व्यवसायावर अवलंबून आहे. अमेरिका आणि युरोपमधील बाजारपेठांमधील मागणी, बदलती ग्राहक पसंती आणि कच्च्या मालाच्या किमतीतील चढ-उतार यांचा थेट परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होऊ शकतो. जागतिक व्यापारातील अस्थिरता हे या क्षेत्रासाठी एक मोठे आव्हान राहू शकते, त्यामुळे कंपनीच्या प्रत्येक तिमाही निकालांवर आणि मॅनेजमेंटच्या कमेंटरीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
