KPIT Technologies ने दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मात्र, Prabhudas Lilladher ने कंपनीवर 'Reduce' रेटिंग कायम ठेवले असून, युरोपमधील ऑटो कंपन्यांच्या प्रकल्प दिरंगाईमुळे गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
KPIT Technologies ने दुसऱ्या तिमाहीत मार्केटच्या अंदाजांना मागे टाकत चांगली कामगिरी केली आहे. कंपनीचा EBIT मार्जिन १२.७% राहिला असून, तो विश्लेषकांच्या ११.७% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. ट्र ट्रक आणि ऑफ-हायवे सेगमेंटमधील १७.६% महसूल वाढीमुळे कंपनीला मोठा आधार मिळाला आहे.
चिंतेचे कारण काय?
चांगल्या निकालानंतरही Prabhudas Lilladher ने या शेअरवर 'Reduce' रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राईस ₹५२० निश्चित केली आहे. प्रमुख समस्या पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये दिसत आहे. युरोपमधील कार कंपन्यांनी आर अँड डी (R&D) खर्चात कपात केल्याने अनेक प्रकल्प २०२८ वरून २०२९-३० पर्यंत लांबणीवर पडले आहेत.
जॉइंट व्हेंचर Qorix ची स्थिती
कंपनीच्या Qorix या जॉइंट व्हेंचरचा तोटा मागील तिमाहीतील १४० दशलक्ष रुपयांवरून १५६ दशलक्ष रुपयांपर्यंत वाढला आहे. प्रकल्पांना होणारा विलंब हेच या तोट्याचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.
भविष्यातील संधी
कंपनीने २०२८ पर्यंत EBITDA मार्जिन पुन्हा २०-२१% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष कंपनीच्या $२१३ दशलक्ष च्या नवीन डील ऑर्डर्स प्रत्यक्ष महसुलात कशा रूपांतरित होतात, याकडे लागले आहे.
