ब्रोकरेज फर्म जेफरीजने अदानी समूहाच्या चार कंपन्यांसाठी 'बाय' रेटिंग दिल्याने आज शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. कंपनीच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांचा हा परिणाम असला, तरी वाढत्या कर्ज आणि प्रोजेक्ट्सच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे गुंतवणूकदारांसाठी गरजेचे आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सनी जोरदार मुसंडी मारली. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने अदानी समूहाच्या चार प्रमुख कंपन्यांवर विश्वास दाखवत 'बाय' रेटिंग दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 'जेफरीज इंडिया फोरम २०२६' मध्ये कंपनीने मांडलेल्या आक्रमक विस्तार योजना आणि भविष्यातील वाढीच्या संधींमुळे विश्लेषक सकारात्मक झाले आहेत.
कोणाची झाली सर्वाधिक कमाई?
आजच्या सत्रात Adani Total Gas हा शेअर टॉप गेनर ठरला असून त्यात जवळपास १५% ची वाढ नोंदवण्यात आली. तसेच Adani Green Energy, Adani Energy Solutions आणि Adani Ports या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. कंपनीने भविष्यातील कॅपिटल एक्सपेंडिचरचे (Capex) उद्दिष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
भविष्यातील नियोजन आणि आव्हाने
जेफरीजच्या अहवालानुसार, Adani Energy Solutions स्मार्ट मीटर आणि ग्रीड विस्तार करण्यावर भर देत आहे. Adani Green Energy ने FY27 पर्यंत ५ गिगावॅट क्षमता वाढवण्याचे लक्ष्य ठेवले असून, बॅटरी स्टोरेजवर त्यांचा विशेष भर आहे. तसेच Adani Ports २०२३० पर्यंत १ अब्ज टन कार्गो हाताळण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज आहे.
गुंतवणूकदारांसाठी या कंपनीचे दीर्घकालीन व्हिजन चांगले दिसत असले, तरी अशा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. त्यामुळे कंपनी कर्ज कसे हाताळते आणि त्यातून पुरेसा कॅश फ्लो कसा निर्माण करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रकल्पांना होणारा विलंब, नियम आणि व्याजाच्या दरातील चढ-उतार यांसारखी जोखीम कायम असल्याने, गुंतवणूकदारांनी कंपनीच्या तिमाही निकालांवर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे.
