इन्स्टिट्यूशनल बँकिंगकडे वाटचाल
Citigroup (Citi) ने मुंबईत झालेल्या उच्च-स्तरीय बैठकीनंतर भारतात आपल्या भविष्यातील धोरणांची स्पष्ट केली आहे. कंपनी आता आपला सर्व फोकस हा इन्स्टिट्यूशनल बँकिंगवर ठेवत आहे. रिटेल ग्राहकांना सेवा देणे थांबवून, Citi मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थांना बँकिंग सेवा देणार आहे. CEO जेन फ्रेझर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर हा निर्णय अधिकच महत्त्वाचा ठरला आहे. कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा अधिक वेगवान आणि कार्यक्षम करण्यावर Citi चा भर असेल. जगभरातील 80% Fortune 500 कंपन्या Citi च्या ग्राहक यादीत आहेत आणि या जागतिक नेटवर्कचा फायदा भारतातही घेण्याचा कंपनीचा मानस आहे.
