कंपनीने का घेतला हा निर्णय?
Landmark Cars Limited आता दिल्ली NCR भागातील Volkswagen कामकाज 31 मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे बंद करणार आहे. या निर्णयाअंतर्गत कंपनी एक Volkswagen शोरूम आणि एक वर्कशॉप बंद करणार आहे. मागील काही काळापासून या आऊटलेट्समध्ये सतत तोटा होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
गुजरातमध्ये कामकाज सुरूच
दिल्ली NCR मधील हे आऊटलेट्स बंद झाले तरी, Landmark Cars ने स्पष्ट केले आहे की गुजरातमध्ये Volkswagen व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू राहील. अधिक फायदेशीर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आणि संचालन खर्च कमी करून कंपनी आपल्या एकूण आर्थिक स्थितीत सुधारणा करू इच्छिते.
ऑटो रिटेल क्षेत्रातील आव्हानं
ऑटो रिटेल क्षेत्रात उच्च निश्चित संचालन खर्च (high fixed operational costs) आणि उत्पादक ब्रँडच्या कामगिरीवर अवलंबून राहणे यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे Landmark Cars सारख्या कंपन्यांना नफा टिकवून ठेवण्यासाठी नेटवर्कमध्ये बदल करावे लागतात.
कंपनीवर काय परिणाम होईल?
Landmark Cars च्या मते, या निर्णयामुळे कंपनीच्या एकूण व्यवसायावर फारसा आर्थिक परिणाम होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बंद होणाऱ्या आऊटलेट्सशी संबंधित मालमत्तेचे अवमूल्यन (asset depreciation) कमी होण्याची शक्यता आहे.