TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) ने इंग्लंडमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब टॉटनहॅम हॉटस्परसोबत (Tottenham Hotspur) एक मोठी मल्टी-इयर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे. यानुसार, TCS आता क्लबचे 'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर' (Digital Transformation Partner) बनणार आहे.
युकेमध्ये 5,000 नव्या नोकऱ्या!
या पार्टनरशिप अंतर्गत, TCS टॉटनहॅम हॉटस्परला तंत्रज्ञानाचा वापर करून चाहत्यांचा अनुभव (fan engagement) आणि क्लबचे ऑपरेशन्स (operations) सुधारण्यास मदत करेल. विशेष म्हणजे, या डीलचा एक भाग म्हणून TCS यूकेमध्ये 5,000 नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
TCS चा गेम प्लॅन
या करारामुळे TCS ला क्रीडा क्षेत्रात आपली ओळख आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल. विशेषतः फुटबॉलसारख्या लोकप्रिय खेळात पार्टनरशिप केल्याने जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. TCS चे FY25 साठीचे ग्लोबल रेव्हेन्यू $30 बिलियन पेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे.
