अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांना परवानगी देणाऱ्या सरकारी धोरणात्मक बदलांचा फायदा घेत, अदानी पॉवरने या महत्त्वाकांक्षी क्षेत्रात प्रवेश केला आहे.
कंपनीची उपकंपनी Adani Atomic Energy Limited (AAEL) मार्फत Coastal-Maha Atomic Energy Limited (CMAEL) या नवीन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या नवीन कंपनीचे अधिकृत भांडवल (authorised capital) ₹5,00,000 इतके ठेवण्यात आले आहे.
CMAEL ची स्थापना अणुऊर्जा निर्मिती, वहन आणि वितरणाच्या उद्देशाने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये पारित झालेल्या Sustainable Harnessing and Advancement of Nuclear Energy for Transforming India (SHANTI) Act मुळे खासगी कंपन्यांना अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि ते चालवण्याची संधी मिळाली आहे. अदानी पॉवरने याच संधीचा फायदा घेतला आहे.
यामुळे कंपनी आपल्या ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये थर्मल आणि रिन्यूएबल एनर्जीसोबतच अणुऊर्जेचाही समावेश करून आपले विस्तार धोरण (diversification strategy) अधिक मजबूत करत आहे. विशेष म्हणजे, अदानी पॉवरने यापूर्वीच फेब्रुवारी 2026 मध्ये Adani Atomic Energy Limited (AAEL) ची स्थापना करून अणुऊर्जा क्षेत्रातील संधींची चाचपणी सुरू केली होती.
या नव्या क्षेत्रात प्रवेश करताना कंपनीला मोठे भांडवल, दीर्घ विकास कालावधी आणि कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे. या क्षेत्रात Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) सारख्या सरकारी कंपन्यांचे वर्चस्व आहे, मात्र NTPC Limited, Tata Power आणि Naveen Jindal Group सारख्या कंपन्याही या क्षेत्रात उतरण्यास इच्छुक आहेत. अदानी पॉवर आता या स्पर्धेत उतरली आहे.
