नवीन आर्थिक वर्षातील पहिली मोठी डील
IRFC ने आर्थिक वर्ष 2026-27 (FY27) ची सुरुवात धमाकेदार केली आहे. कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) ला ₹1,000 कोटी चे Term Loan मंजूर केले आहे. हे नवीन आर्थिक वर्षातील IRFC चे पहिले Funding disbursement असून, त्यांच्या वार्षिक Funding Activities च्या सुरुवातीचे संकेत देत आहे.
IRFC चा वाढता विस्तार
IRFC ची ओळख प्रामुख्याने भारतीय रेल्वेसाठी Funding पुरवणारी संस्था म्हणून आहे. मात्र, आता कंपनी आपली व्याप्ती केवळ रेल्वेपुरती मर्यादित ठेवत नाहीये. वीज निर्मिती (Power Generation) आणि लॉजिस्टिक्स (Logistics) सारख्या इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रांनाही Funding पुरवून IRFC आपला व्यवसाय वैविध्यपूर्ण करत आहे. कंपनी नेहमीच आपल्या कामात Asset Quality राखण्यावर आणि Zero Non-Performing Asset (NPA) ठेवण्यावर भर देते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत राहते.